logo
links
aboutus cashew
arial view

कोकणगाभा हे नावाप्रमाणेच कोकणच्या कुशीत म्हणजेच मुक्काम गव्हाणे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे, मुंबई गोवा महामार्गापासून अगदी ३ किलोमीटर अंतरावर वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे . 'कोकणगाभा' हे उद्यमशील, मेहनती आणि कल्पक अशा तरुण मंडळींच्या एकत्रित श्रमाचे फलित आहे सूक्ष्म निरीक्षण, विश्लेषण आणि नियोजानांती कोकणगाभाने १०५ एकर जमीन संपादित केली ज्यातील ५० एकर जमीन व्यावसायिक लागवडीसाठी विकसित करण्यात आली. या जमिनीमध्ये सुमारे ५००० काजूची उत्तम प्रतीची झाडे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून मुख्य पिक म्हणून लावण्यात आली अहेत. काजू या मुख्य पिकाशिवाय पुढे नमूद नानाविध प्रकारची फळझाडे आणि वृक्ष विकसित जमिनीमध्ये लावण्या आली आहेत.

जसे :
आंब्याचे प्रकार : हापूस , पायरी , तोतापुरी , राजापुरी, नीलम, रत्ना, केसर, रायवळ इत्यादी .
नारळाचे प्रकार: बाणवली, ऑरेंज ड्वार्फ ,टीडी इत्यादी
लिंबूवर्गातील झाडे : संत्री , मोसंबी , पपनस, इडलिंबू , कागदी लिंबू , माल्टा संत्री
कोकणातील पारंपारिक झाडे : कोकम, फणस, पपई, कलिंगड, चिबूड, अननस, पेरू, चिकू, जाम, आवळे, जांभूळ, करवंद, साग, बांबू इत्यादी
मसाला : हळद, मिरच्या, जायफळ, वेलची, ऑल स्पाइस इत्यादी

याबरोबरच हंगामाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादनसुद्धा इथे घेतले जाते जसे लाल भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, टोमाटो, मिरच्या, आले, पडवळ, कारली, तोंडली, मेथी, मुळा, अळू.

vegetables
fruits
fishing
महत्वाचे म्हणजे या सर्व पिकांपासून आणि झाडांपासून उत्तम प्रतीचे आणि सुद्धृढ उत्पादन मिळवण्यासाठी सेंद्रिय खताच्या वापरावर 'कोकणगाभा ' सुरुवातीपासूनच भर देत आला आहे

मत्स्यशेती :
कोकणगाभा मध्ये १२००० चौरस फुटाचे एक शेततळे करण्यात आले आहे . या तळ्यामध्ये गोड्या पाण्यातल्या मासे जसे रोहू , काटला, थिलपिया यांचे संवर्धन केले जाते .

vegetables
fishing
fishing
कोकण पर्यटन
उत्तम पर्यटन व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 'कोकण पर्यटन' सुद्धा सुरु केले आहे. मोठ्या गटांना , प्रवास, भ्रमंती आणि निवास या सर्व सोयींसह एक परिपूर्ण 'पॅकेज' आम्ही आयोजित करून देतो. कोकणगाभ्याचा हा प्रकल्प यशस्वी वाटचाल करीत आहे आणि आपल्या सर्वासाठी आणखी बरंच काही उलगडून दाखवण्याच्या प्रयत्नात राहील.
भौगोलिक स्थान:
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकणपट्ट्याच्या १६.३० ते १८.०० अक्षांश आणि ७३.०० ते ७४.०० रेखांशामध्ये रत्नागिरी वसलेलं आहे. उत्तर-दक्षिण १८० किलोमीटर आणि पूर्व-पश्चिम ६४ किलोमीटर सामावून घेणाऱ्या ह्या जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा नयनरम्य सागरीकिनारा लाभला आहे. रत्नागिरीच्या उत्तरेला रायगड, दक्षिणेला सिंधुदुर्ग, पश्चिमेला अरब महासागर तर पूर्वेला राकट सह्याद्री पर्वतरांग आहे.
परिसर आणि स्थळवर्णन:
रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८३२६ वर्ग किलोमीटर, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या २.७% एवढे आहे. भौगोलिक दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचे तीन प्रमुख भाग करता येतील:
१. पूर्व हद्दीचा, सह्याद्रीच्या राकट पर्वतरांगा असणारा डोंगराळ प्रदेश
२. पूर्वेकडील डोंगररांगा आणि पश्चिमेकडील सागरी किनारा यांच्या मध्यभागी असणारा, भात, नाचणी यांसारख्या पिकांचे उत्त्पन्न देणारा पठारी प्रदेश
३. पश्चिमेकडील, नारळी, पोफळी, आंबा यांसारख्या पिकांचे उत्त्पन्न देणारा समृध्द सागरी किनारा

माती: या जिल्ह्याची माती प्रामुख्याने गडद लाल, तपकिरी लाल अशा रंगांची, पाणी धरून ठेवण्याची उत्तम क्षमता असणारी, लोहयुक्त चिकण माती आहे.

नद्या: जिल्ह्यातील सर्व नद्या सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे (पश्चिमवाहिनी) वाहत अरब महासागराला मिळतात. उत्तर परिघावर, जिल्ह्यात जवळपास ३५ किलोमीटर पर्यंत जलाप्रवासायोग्य असणारी सावित्री नदी रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार करत वाहते. जिल्ह्यात वशिष्ठी, जगबुडी, कसतर, बाड, मुचकुंडी आणि जैतापूर या इतरही नद्या वाहतात. अनेक लहान मोठ्या खाड्या, जलाशय आणि धरणांनी रत्नागिरी जिल्हा व्यापला आहे, ज्यांचा विकास करून जिल्ह्यातील पर्यटन विकास करण्यात येवू शकेल. बऱ्याच नद्या या बारमाही नसल्या तरी पावसाळ्यात मात्र त्या तुडुंब भरून वाहतात.
हवामान आणि पर्जन्य: रत्नागिरी हा दमट हवामानाचा प्रदेश आहे. तेथे तीन मुख्य ऋतू अनुभवता येतात. उन्हाळा (मार्च ते मे), पावसाळा (जून ते ऑक्टोबर) आणि हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी). सागरी किनारा जवळ असल्याने जिल्ह्यातील दिवस आणि रात्रीच्या तापमानात जास्त फरक आढळून येत नाही. तर जून ते ऑक्टोबर दरम्यान बरसणाऱ्या पावसाला नैरुत्य मौसमी वारे कारणीभूत ठरतात. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ३७८७ मि.मी. इतकी भरते परंतु संपूर्ण जिल्ह्यात कोठेही एकसमान परिमाणात पाऊस पडत नाही.
अरण्य: जिल्ह्यातील ६७०० हेक्टर परिसरात असणारा जंगलाचा भाग, जिल्ह्याचा एकूण क्षेत्रफळाच्या ०.८२% इतका आहे. यातील जास्त जंगल पट्टा खेड, लांजा, दापोली आणि राजापूर तालुक्यामध्ये येतो. या जंगलांमधून लाकूड, सरपण, शिकाकाई आणि डिंक यांचे उत्त्पन्न प्रामुख्याने मिळते. जास्तीत जास्त भूभाग जंगलमय बनविण्यासाठी सामाजिक वनीकरण खात्यातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
 
bottom links