logo
links
aboutus cashew
कोकणगाभा भ्रमंती:

शिबिराच्या शेतातील भ्रमंतीमध्ये शेतकी विषयक आणि तत्सम अनेक उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह अनुभवायला मिळते. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

अ. लागवड: रोपवाटिकेमध्ये कलम बनविण्यापासून त्यांचे रोपण करण्यापर्यंत आवश्यक असणाऱ्या कार्यप्रणाली

ब. संरक्षण: तण खुरपणी, झाडांची व्यवस्थित छाटणी करणे, कीटकनाशक फवारणी, खत पुरवठा इत्यादी कार्यपद्धती, आधुनिक सामग्री व अवजारांचा वापर करून पार पाडणे.

कोकणगाभ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक आनंदयात्रीला पुरेपूर निसर्गसहवास, शांतता आणि अविस्मरणीय क्षण मिळवून देण्याची आम्ही हमी देतो. त्यातील अनेक जण शेतामधेच बराच वेळ राहून तेथील कामामध्ये रमतात
     
vegetables
fruits
fishing
मासेमारी:

कोकणगाभ्यामध्ये १२००० वर्ग फुटांचे एक शेततळे विकसित करण्यात आले आहे, ज्यात रोहू, काटला, कोळंबी इत्यादी माश्यांची पैदास केली जाते. कोकणगाभ्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदयात्रीला शेततळ्यामध्ये मासे पकडण्याची कला अवगत करण्यातसुद्धा उत्तम दिवस घालवता येतो.
     
vegetables
vegetables
vegetables
वनभोजन:
कोकणगाभ्यालागत वाहणाऱ्या ‘बेणी’ नदीकिनारी एक पुरातन प्रचंड आम्रवृक्ष आहे. त्याच्या शीतल छायेमध्ये वनभोजनाचा उत्तम कार्यक्रम (मागणीनुसार) आखला जातो. तुम्हाला वनभोजनाचे जेवणही स्वतःच्या हाताने बनवण्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी कोकणगाभ्यातर्फे खास मातीच्या भांड्यांची आणि चूलीची व्यवस्थाही केली जाते, अन्यथा स्वयंपाकी दिला जातो.
vegetables
vegetables
vegetables river play जलक्रीडा:
कोकणगाभ्यालगत वाहणाऱ्या बेणी नदीच्या (हंगामी – जून ते मार्च) पात्रात मनसोक्त पोहण्याचा आनंद उपभोगता येतो. नदीऐवजी घराजवळच नव्याने बांधण्यात येत असलेल्या जलतरण तलावात सुद्धा जलतरणाची मजा घेता येते.
 
कँपफायर:

समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर असणाऱ्या कोकणगाभ्यामध्ये हिवाळ्यातील कँपफायर (शेकोटी) एक अविस्मरणीय आठवण देऊन जाते.
camp fire camp fire
bird bird पक्षीनिरीक्षण:
कोकणगाभ्यात अर्ध्या भागात (साधारण ५० एकर) शेती विकसित केली आहे तर अर्ध्या भागात असणारे नैसर्गिक वन जतन करून ठेवले आहे. भल्या पहाटे वनाची शांतता भंग न करता भ्रमंती करून आल्यास विविध जातींचे पक्षी आपल्या नजरेला पडू शकतात.
bird bird
स्थानिक लोक-कला कार्यक्रम (फक्त मोठ्या गटांसाठी, पूर्वसूचनेने):

जाखडी – गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या गौरीच्या आगमनासाठी, कोकणातील स्थानिक कुणबी समाजातील लोकांतर्फे करण्यात येणाऱ्या या पारंपारिक नृत्याला ‘जाखडी’ असे म्हणतात. मंडळातील ‘उस्ताद’ आणि वादकाच्या सुरेल संगीतावर, दोघांभोवती एका अदृश्य वर्तुळात ८-१० नृत्यकलाकारांकडून हा मन भारावून टाकणारा नृत्याविष्कार सदर केला जातो. खेळे / नमन- खेळे / नमन ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रसिद्ध असणारी, संगीत आणि नाटकाचा उत्कृष्ठ समन्वय साधणारी एक स्थानिक लोक-कला आहे. याशिवाय भजन, कीर्तनासारखे कार्यक्रमदेखील आयोजित करता येतात
jakhadi dance camping यांशिवाय, इतर कार्यक्रम जसे कॅम्पिंग (डोंगरमुक्काम), सर्प दर्शन आणि ओळख यांचे आयोजनही पूर्वसूचनेने करण्यात येते. मात्र त्यांचे आयोजन हवामानावर अवलंबून राहील

पुढील स्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रमसुद्धा आखला जातो: काजू प्रक्रिया उद्योग, परिसरातील जुनी देवालये, कोकण कृषी विद्यापीठ (लांजा), लांज्यात दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार, कोलधे - झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचे गाव आणि घर
snakes cashew factory
nanij math
blank
ganeshgule beach
  कोकणगाभ्याहून एका दिवसात भेटी देता येण्यासारखी ठिकाणे:
bullet रत्नागिरी शहर, किल्ला, समुद्रकिनारा,
लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान (४५ कि.मी.)
bullet स्वामी स्वरूपानंद देवालय – पावस (३५ कि.मी.)
bullet गणेशगुळे समुद्रकिनारा (४० कि.मी.)
bullet गणपतीपुळे, जयगड (१०० कि.मी.)
bullet प्राचीन मार्लेश्वर देवस्थान (६५ कि.मी.)
bullet अंबा घाट (४५ कि.मी.)
bullet राजापूरचे गंगास्थान आणि गरम पाण्याचे झरे (३५ कि.मी.)
bullet नरेंद्रमहाराज मठ, नाणीज (२२ कि.मी.)

ratnadurga
 
 
bottom links