logo
photos
links
  कोकणगाभा भ्रमंती
  शिबिराच्या शेतातील भ्रमंतीमध्ये शेतकी विषयक आणि तत्सम अनेक उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह अनुभवायला मिळते. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

अ. लागवड: रोपवाटिकेमध्ये कलम बनविण्यापासून त्यांचे रोपण करण्यापर्यंत आवश्यक असणाऱ्या कार्यप्रणाली

ब. संरक्षण: तण खुरपणी, झाडांची व्यवस्थित छाटणी करणे, कीटकनाशक फवारणी, खत पुरवठा इत्यादी कार्यपद्धती, आधुनिक सामग्री व अवजारांचा वापर करून पार पाडणे.

कोकणगाभ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक आनंदयात्रीला पुरेपूर निसर्गसहवास, शांतता आणि अविस्मरणीय क्षण मिळवून देण्याची आम्ही हमी देतो. त्यातील अनेक जण शेतामधेच बराच वेळ राहून तेथील कामामध्ये रमतात
   
 
vegetables
fruits
fishing
   
मासेमारी:
  कोकणगाभ्यामध्ये १२००० वर्ग फुटांचे एक शेततळे विकसित करण्यात आले आहे, ज्यात रोहू, काटला, कोळंबी इत्यादी माश्यांची पैदास केली जाते. कोकणगाभ्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदयात्रीला शेततळ्यामध्ये मासे पकडण्याची कला अवगत करण्यातसुद्धा उत्तम दिवस घालवता येतो.
   
 
vegetables
vegetables
vegetables
   
 
   वनभोजन:    कँपफायर:
कोकणगाभ्यालागत वाहणाऱ्या ‘बेणी’ नदीकिनारी एक पुरातन प्रचंड आम्रवृक्ष आहे. त्याच्या शीतल छायेमध्ये वनभोजनाचा उत्तम कार्यक्रम (मागणीनुसार) आखला जातो. तुम्हाला वनभोजनाचे जेवणही स्वतःच्या हाताने बनवण्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी कोकणगाभ्यातर्फे खास मातीच्या भांड्यांची आणि चूलीची व्यवस्थाही केली जाते, अन्यथा स्वयंपाकी दिला जातो. समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर असणाऱ्या कोकणगाभ्यामध्ये हिवाळ्यातील कँपफायर (शेकोटी) एक अविस्मरणीय आठवण देऊन जाते.
vegetables vegetables
camp fire camp fire
   
पक्षीनिरीक्षण:
 
bird bird कोकणगाभ्यात अर्ध्या भागात (साधारण ५० एकर) शेती विकसित केली आहे तर अर्ध्या भागात असणारे नैसर्गिक वन जतन करून ठेवले आहे. भल्या पहाटे वनाची शांतता भंग न करता भ्रमंती करून आल्यास विविध जातींचे पक्षी आपल्या नजरेला पडू शकतात. जसे मोर, खंड्या , लालबुड्या बुलबुल.
bird bird
   
जलक्रीडा:
  कोकणगाभ्यालगत वाहणाऱ्या बेणी नदीच्या (हंगामी – जून ते मार्च) पात्रात मनसोक्त पोहण्याचा आनंद उपभोगता येतो. नदीऐवजी घराजवळच नव्याने बांधण्यात येत असलेल्या जलतरण तलावात सुद्धा जलतरणाची मजा घेता येते.
 
   
vegetables
river play
   
स्थानिक लोक-कला कार्यक्रम (फक्त मोठ्या गटांसाठी, पूर्वसूचनेने):
 
jakhadi dance जाखडी – गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या गौरीच्या आगमनासाठी, कोकणातील स्थानिक कुणबी समाजातील लोकांतर्फे करण्यात येणाऱ्या या पारंपारिक नृत्याला ‘जाखडी’ असे म्हणतात. मंडळातील ‘उस्ताद’ आणि वादकाच्या सुरेल संगीतावर, दोघांभोवती एका अदृश्य वर्तुळात ८-१० नृत्यकलाकारांकडून हा मन भारावून टाकणारा नृत्याविष्कार सादर केला जातो.
नमन- खेळे - नमन ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रसिद्ध असणारी, संगीत आणि नाटकाचा उत्कृष्ठ समन्वय साधणारी एक स्थानिक लोक-कला आहे. याशिवाय भजन, कीर्तनासारखे कार्यक्रमदेखील आयोजित करता येतात
   
कॅम्पिंग (फक्त मोठ्या गटांसाठी, पूर्वसूचनेने):
 
camping कॅम्पिंग (डोंगरमुक्काम) यांचे आयोजनही पूर्वसूचनेने करण्यात येते. मात्र त्यांचे आयोजन हवामानावर अवलंबून राहील
   
प्रेक्षणीय स्थळ दर्शन :
  पुढील स्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रमसुद्धा आखला जातो:
 
cashew factory nanij math
काजू प्रक्रिया केंद्र - २ किमी
या ठिकाणी बागेतून काढलेला काजू ते बाजारात मिळणारा काजू या प्रक्रियेतील वेगवेगळे टप्पे बघता येतात
मल्लिकार्जुन मंदिर - ५ किमी
झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या माहेरचे कुलदैवत. हे एक पुरातन मंदिर यास दगडांची तटबंदी आहे तसेच जुनी विशाल दीपमाळ बघावयास मिळेल
नाणीज मठ - २० किमी
धार्मिक स्थळ . श्री नरेंद्र महाराज यांचे वसतिस्थान. नवीन वास्तुकलेचा व सुशोभित सुंदर बागिच्यांचा एक उत्तम नमुना
ganeshgule beach thibaw palace aquarium
गणेशगुळे समुद्रकिनारा - ३५ किमी निर्जन,स्वच्छ , नारळी पोफळीच्या बागा व सुरुची झाडे असणारा समुद्रकिनारा थिबा राजाचा राजवाडा : ३५ किमी
ब्रम्हदेशचा राजा थिबा यास इंग्रजांनी रत्नागिरीत राजकीय बंदी म्हणून ठेवले होते. त्याच्यासाठी हा राजवाडा बांधला होत. हा राजवाडा सुस्थितीत असून इथे आता राजाच्या वापरातील वस्तूंचे संग्रहालय आहे
रत्नागिरी मत्स्यालय : ३५ किमी
या मत्स्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे मासे , समुद्री कासव, समुद्री घोडा, पाणसाप यासारखे जीव बघायला मिळतात. इथे असणारा देवामाश्याचा ५५ फुट लांब सांगाडा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे
ratnadurga birth place of lokmanya tilak swaroopanand math
रत्नदुर्ग किल्ला व भगवती मंदिर - ३५ किमी
रत्नागिरी शहराच्या अगदी सीमेवर असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीवरून अरबी समुद्राचे भव्य स्वरूप दिसते. या किल्ल्यात एक भगवती देवीचे मंदिर पुरातन मंदिर आहे
लोकमान्य टिळक जन्मस्थान - ३५ किमी
बाल गंगाधर टिळक यांचे जुने घर रत्नागिरीत पहावयास मिळते. तिथे त्यांच्या काही वस्तूंचा संग्रह केला आहे
पावस - ३० किमी
धार्मिक स्थळ , स्वामी स्वरूपानंद यांचे समाधीस्थळ. अतिशय सुंदर व स्वच्छ परिसर.
ganapatipule temple prachin kokan museum marleshwar temple
गणपतीपुळे - ६० किमी
सुप्रसिद्ध गणपती मंदिर, स्वच्छ समुद्रकिनारा
प्राचीन कोकण म्युझियम - ६० किमी
प्राचीन कोकणाची प्रतिकृती, जुनी भांडी, हत्यारे यांचा संग्रह . जुन्या जीवनशैली दाखवणारे देखावे
मार्लेश्वर मंदिर - १०० किमी
चहुबाजूनी डोंगरांनी वेढलेले शंकराचे मंदिर , बारमाही वाहणारा धबधबा हे विशेष आकर्षण
   
links
kokangabha