logo
photos
links
व्यावसायिक प्रस्ताव
खालीलपैकी कोणत्याही प्रस्तावासाठी श्री शिरीष झारापकर ९२२३५ ६७ १५१ / ९८२०० ६६ १०७ यांच्याशी संपर्क साधावा
गुंतवणूकदाराला खालीलपैकी कोणत्याही प्रस्तावासाठी 'कोकणगाभा टाईमशेअर ' देण्यात येईल . ( त्याच्या गुंतवणुकीनुसार दरवर्षी १५ दिवस , १० ते २५ वर्षापर्यंत )
प्रपोज्ड साईट प्लान प्रमाणे खालील सुविधा पूर्ण होऊन कार्यशील आहेत
2. Kitchen
4. Rainwater Pond
6. Parking
8. Agricultural Area
11. Plantation Area
13. Stay Facility
14. Outdoor Games
15. Toilets
16. Lawn
17. Office
18. Vrindavan
प्रस्ताव १ : वैयक्तिक गुंतवणुकदार (शेती व पर्यटन निगडीत )
कोकण गाभा या प्रकल्पामध्ये गुंतवणुकीची संधी आहे तरी ज्या निसर्गप्रेमींना यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधावा . त्याची माहिती खालीलप्रमाणे
१) कोकणगाभ्याच्या ताब्यातील १०० एकर जमिनीतील २० एकर जमीन १० लाख प्रती एकर या भावाने विक्रीसाठी उपलब्ध (फक्त शेतीसाठी ).
२) या प्रकल्पात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सामील होता येईल
अ- अप्रत्यक्ष भागीदार -
जो फक्त आर्थिक गुंतवणूक करेल व दैनंदिन कामकाजात ज्याचा कोणताही सहभाग नसेल.
त्याची भागीदारी त्यांनी घेतलेल्या जमिनीच्या प्रमाणात असेल (उदा. - प्रत्येक एकर जमिनीमागे एक टक्का अशी भागीदारी देण्यात येईल ).
प्रत्येक वर्षी एक वार्षिक सभा घेण्यात येईल व त्यात झालेल्या फायद्याचे वितरण करण्यात येईल.
अशा गुंतवणूकदारांकडून प्रतिवर्षी सल्लागार शुल्क म्हणून सामंजस्याने ठरविलेली रक्कम आकारण्यात येईल
ब - प्रत्यक्ष भागीदार
जो गुंतवणूकही करेल व दैनंदिन कामकाजात सहभागी होईल
त्याची भागीदारी त्यांनी घेतलेल्या जमिनीच्या प्रमाणात असेल (उदा. - प्रत्येक एकर जमिनीमागे एक टक्का अशी भागीदारी देण्यात येईल ).
प्रत्येक वर्षी एक वार्षिक सभा घेण्यात येईल व त्यात झालेल्या फायद्याचे वितरण करण्यात येईल.
अशा गुंतवणूकदारांकडून प्रतिवर्षी सल्लागार शुल्क म्हणून सामंजस्याने ठरविलेली रक्कम आकारण्यात येईल
३) गुंतवणुकीचा कालावधी हा किमान ६ वर्षे असावा. ६ वर्षे पूर्ण झाल्यावर अशा भागीदार या प्रकल्पातून बाहेर पडण्याची एक संधी घेता येईल. त्यावेळी त्यांची जमीन पुन्हा विकत घेतली जाईल . त्याच्या मोबदल्यात त्यांनी गुंतवलेली रक्कम + ७% सरळव्याज किंवा जमिनीचा त्यावेळचा बाजारभाव यापैकी जे अधिक असेल त्या रकमेचा परतावा करण्यात येईल तरी या परताव्याउपरांतसुद्धा त्यांचा टाईमशेअर त्यांना दिलेल्या कालावधीपर्यंत कार्यशील राहील . मात्र असे करावयाचे नसल्यास त्यांना कायमस्वरूपी भागीदार म्हणून प्रकल्पात सामावून घेतले जाईल
४) भागीदारांना सहकुटुंब दरवर्षी किमान १५ दिवस मोफत राहण्याची व सर्व सुविधांचा उपभोग घेण्याची मुभा असेल. याचा कालावधी १० ते २५ वर्षापर्यंत गुंतवणुकीच्या अनुसार राहील
५) दरवर्षी ताळेबंद, लाभांश व पुढील वाटचाल यासंबंधी चर्चा करण्यासाठी वार्षिक सभेचे आयोजन करण्यात येईल
प्रस्ताव २ - बांधा उपभोगा आणि हस्तांतरित करा - Build Operate and Transfer
BOT तत्वावर खालील प्रकल्प राबविणे :
              अ) डेअरी प्रकल्प
               ब) कुक्कुटपालन
               क) शेळीपालन
               ड) मत्स्यपालन
               इ ) कृषी प्रक्रिया केंद्र इत्यादी
प्रस्ताव ३ : निराधार किंवा अशिक्षित तरुण (तसेच स्वयंसेवी संस्थांशी संलग्नित )
या मुलांची राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल तसेच त्यांना शेती व शेतीउद्योग किंवा पर्यटन ह्यापैकी त्यांचा कल जाणून त्यांना प्रशिक्षित केले जाईल व त्यांना कायमस्वरूपी नोकरी किंवा उद्योग करण्याची संधी दिली जाईल
प्रस्ताव ४ : गुंतवणूकदारांसाठी - For Real Estate Investors
कोकणगाभाच्या व्यवस्थापकांचा निवासी संकुल प्रकल्प तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे चालू आहे. इच्छुक गुंतवणूकदारांसाठी त्याची माहिती खालीलप्रमाणे;
हा प्रकल्प श्री राऊळ महाराज मठ , या धार्मिक स्थानाजवळ स्थित आहे ह्याचे अंतर काही महत्वाच्या ठिकाणांहून पुढीलप्रमाणे-
              अ) कुडाळ बस स्थानक : ३किमी
              ब) कुडाळ रेल्वे स्थानक : ५ किमी
              क) मुंबई-गोवा महामार्ग : ५००मी
              ड) कुडाळ - वेंगुर्ला महामार्ग : ५०० मी
              इ) प्रस्तावित विमानतळ : २५ किमी
              फ) प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्प : २५ किमी
              ग) गोवा : ५० किमी
siteplan sadanirmal brochure building plan ground floor plan first floor plan
प्रस्ताव ५ : कॉर्पोरेट - For Corporates
ज्या कॉर्पोरेट संस्थाना निसर्ग, वन्यजीव व जंगल संवर्धनासाठी कार्य करण्याची इच्छा आहे अश्या संस्थांचे आम्ही स्वागत करतो
 
links
kokangabha