logo
photos
links
सेंद्रिय उत्पादने
कोकणगाभामधील सर्व उत्पादने पूर्णतः सेंद्रिय आहेत. महत्वाचे उत्पादन काजूचे असले तरीही त्याव्यतिरिक्त खालील उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतात
फळभाजी : दोडकी, दुधीभोपळा, कारली, भेंडी, तोंडली, केळफूल, शेवगा
पालेभाजी : मुळा, लाल माठ, अळू, मेथी
मसाले : दालचिनी, तिरफळ, तमालपत्र, काळी मिरी, हळद
फळे : कलिंगड, चिबूड, पपई, करवंद, जांभूळ, चिकू, पेरू, फणस, आंबे, ओले काजू, पॅशन फ्रुट
 
ओले काजू : उपलब्ध कालावधी : जानेवारी ते मे
vegetables
vegetables
ओले काजू हे कोकण टापूतील पदार्थांमध्ये मोठया प्रमाणात वापरले जातात. कोकणात व गोव्यात या काजूची उसळ फार प्रसिद्ध आहे. तसेच गुळ खोबऱ्याच्या सारणात हे काजू शिजवल्यास उत्तम गोड पदार्थ तयार होतो. ह्या काजूंचा उपयोग कोणत्याही भाजी किंवा आमटीत मटार प्रमाणे केला जाऊ शकतो.
 
तिरफळ : काढणी डिसेम्बर महिन्यात केली जाते. पूर्ण वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध
vegetables
vegetables
तिरफळाचा वापर गरम मसाल्यामध्ये केला जातो. तसेच कोकण व गोव्यामध्ये माश्याच्या आमटीला तिरफळाच्या स्वादाने खुमारी आणली जाते. ओळी तिरफळे घालून खोबऱ्याची चविष्ट चटणी बनवता येते. आयुर्वेदात तिरफळाच्या काढ्याचे अनेक औषधी उपयोग आहेत
 
पॅशन फ्रुट : उपलब्धता : नोव्हेंबर ते मार्च
vegetables
vegetables
या फळाचे सरबत हे चवीला अतिशय रुचकर व आल्हाददायक असते . याच्या गराचा उपयोग केक, सलाड यांच्या सजावटीसाठी केला जातो. याच्यात विटामिन बी व विटामिन सी मोठया प्रमाणात असते
 
पपई : उपलब्धता : पूर्ण वर्षभर
vegetables
vegetables
पूर्णतः सेंद्रिय व झाडावरच तयार झालेल्या आमच्याकडील पपई ह्या चविष्ट व पौष्टिक आहेत
 
रायवळ आंबे : उपलब्धता : एप्रिल ते जून
vegetables
vegetables
रायवळ आंबे वेगवेगळ्या आकाराचे व चवीचे असतात , ते चोखून खाण्यातच खरी मजा असते हे. चवीला अतिशय गोड व मधुर असतात . कोकणात ह्या आंब्यांचे रायते, आंबापोळी बनविले जाते. आम्ही मुद्दामुन ह्या आंब्यांच्या विविध जाती जोपासित आहोत
 
फणस : उपलब्धता : एप्रिल ते जून
vegetables
vegetables
आमच्याकडे दोन्ही ( कापा आणि बरका ) फणसांची लागवड केली आहे. पिकलेला कापा फणसाचे गरे हे नुसते खाण्यास तर बरक्या फणसांच्या गरयांचा रस फणसपोळी व वडे करण्यास वापरला जातो . तसेच कच्च्या फणसाचा उपयोग हा भाजीसाठी आणि भजीसाठी केला जातो
 
जांभळे : उपलब्धता : एप्रिल ते जून
vegetables
vegetables
जांभूळ हे एक औषधी फळ आहे याच्या उपयोग मधुमेहाच्या उपचारासाठी होतो. आमच्याकडे बारडोली व खाट या दोन प्रकारची जांभळे उपलब्ध आहेत . बारडोली जांभळे ही आकाराने मोठी असतात तर खाट जांभळे ही आकाराने लहान असतात व त्याला एक विशिष्ट प्रकारचा (वाळ्यासारखा ) स्वाद असतो
 
करवंद : उपलब्धता : एप्रिल ते जून
vegetables
vegetables
करवंदाला 'डोंगराची काळी मैना' असेही ओळखले जाते. कच्च्या करवंदाचे लोणचे, चटणीसारखे पदार्थ बनवले जातात. तसेच पिकलेल्या करवंदांचा उपयोग नुसते खाण्याव्यतिरिक्त जॅम, जेली व सरबते सारखी उत्पादने बनविण्यात होतो आम्ही करवंदाची बेटे (जाळी ) जोपासली आहेत
 
रामफळ : उपलब्धता : एप्रिल ते जून
ramphal
vegetables
मऊ , चविष्ट व भरपूर गर असलेल्या या फळामध्ये कमी बिया असतात. यात क जीवनसत्व तसेच जीवनावश्यक क्षारांचे प्रमाण खूप असते
 
सफेद जाम : उपलब्धता : फेब्रुवारी ते जून
ramphal
vegetables
लहान मुलांचे आवडीचे हे फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. या फळाचे मुरांबे सुद्धा बनवले जातात
 
 
links
kokangabha