logo
photos
links
नाविन्यपूर्ण
आम्ही दुर्मिळ असणाऱ्या औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच या नाविन्यपूर्ण भागात आम्ही अश्या काही वनस्पतींची माहिती दिली आहे
 
ओले काजू : उपलब्ध कालावधी : जानेवारी ते मे
vegetables
vegetables
ओले काजू हे कोकण टापूतील पदार्थांमध्ये मोठया प्रमाणात वापरले जातात. कोकणात व गोव्यात या काजूची उसळ फार प्रसिद्ध आहे. तसेच गुळ खोबऱ्याच्या सारणात हे काजू शिजवल्यास उत्तम गोड पदार्थ तयार होतो. ह्या काजूंचा उपयोग कोणत्याही भाजी किंवा आमटीत मटार प्रमाणे केला जाऊ शकतो.
 
तिरफळ : काढणी डिसेम्बर महिन्यात केली जाते. पूर्ण वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध
vegetables
vegetables
तिरफळाचा वापर गरम मसाल्यामध्ये केला जातो. तसेच कोकण व गोव्यामध्ये माश्याच्या आमटीला तिरफळाच्या स्वादाने खुमारी आणली जाते. ओळी तिरफळे घालून खोबऱ्याची चविष्ट चटणी बनवता येते. आयुर्वेदात तिरफळाच्या काढ्याचे अनेक औषधी उपयोग आहेत
 
पॅशन फ्रुट : उपलब्धता : नोव्हेंबर ते मार्च
vegetables
vegetables
या फळाचे सरबत हे चवीला अतिशय रुचकर व आल्हाददायक असते . याच्या गराचा उपयोग केक, सलाड यांच्या सजावटीसाठी केला जातो. याच्यात विटामिन बी व विटामिन सी मोठया प्रमाणात असते
 
रायवळ आंबे : उपलब्धता : एप्रिल ते जून
vegetables
vegetables
रायवळ आंबे वेगवेगळ्या आकाराचे व चवीचे असतात , ते चोखून खाण्यातच खरी मजा असते हे. चवीला अतिशय गोड व मधुर असतात . कोकणात ह्या आंब्यांचे रायते, आंबापोळी बनविले जाते. आम्ही मुद्दामुन ह्या आंब्यांच्या विविध जाती जोपासित आहोत
 
करवंद : उपलब्धता : एप्रिल ते जून
vegetables
vegetables
करवंदाला 'डोंगराची काळी मैना' असेही ओळखले जाते. कच्च्या करवंदाचे लोणचे, चटणीसारखे पदार्थ बनवले जातात. तसेच पिकलेल्या करवंदांचा उपयोग नुसते खाण्याव्यतिरिक्त जॅम, जेली व सरबते सारखी उत्पादने बनविण्यात होतो आम्ही करवंदाची बेटे (जाळी ) जोपासली आहेत
 
links
kokangabha